पणजी : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा म्हणजे विजयादशमी जो हिंदूचा महत्त्वाचा सण आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाच्या उत्सवाचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस भगवान श्रीरामाने रावणावर मिळविलेल्या विजयाच्या आणि देवी दुर्गामातेने महिषासुर राक्षसावर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी म्हटले आहे. दसरा आपल्याला धर्म (नीति) आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. चांगल्याचा नेहमी वाईटावर विजय होतो याची आपल्याला आठवण करून देणारा हा दिवस. हा सण आपली राष्ट्रीय एकात्मता बळकट करतो आणि विविधतेतील एकता या संकल्पनेतील आपल्या अढळ विश्वासाला पुष्टी देतो. या शुभप्रसंगी आम्ही आपल्या समाजात प्रेम, दया, कऊणा आणि सहिष्णूतेचा प्रसार करण्यासाठी आपण स्वत:ला पुन्हा समर्पित करण्याची शपथ घेऊया, असेही राज्यपालांनी म्हटले आहे.
Previous Article‘कदंब’ची 43 वर्षांची अखंडित जनसेवा
Next Article कॅसिनोत चालणाऱ्या बेटिंगवर ‘जीएसटी’ लागू शकत नाही
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









