वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त बुधवारी सायंकाळी विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ ज्योतीनगर येथील भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला. पहाटे 4 वाजता मंदिराचे पुजारी गणेश पाटील यांनी मंत्रघोष करत दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर जन्मोत्सव पाळणा म्हणत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी व्यापारी शंकर काकती, टी. एल. पाटील यांनी व्यापार आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. गजानन पाटील, डॉ. संजय पाटील, युवक विठ्ठल नाईक यांचा सत्कार करण्यात आला. व्यंकटेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. व्यासपीठावर सत्कारमूर्तींसह निवृत्त शिक्षक दाजिबा पाटील व मान्यवर उपस्थित होते.
कंग्राळी खुर्द गावातील जवळपास 75 विधवांना सुवासिनी रेश्मा पाटील हिच्या हस्ते खण नारळांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. निवृत्त प्राध्यापिका पौर्णिमा पाटील यांनी श्रीफळ वाढवल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
निवृत्त मुख्याध्यापक टी. डी. पाटील, अडत व्यापारी विनायक होनगेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष व्यंकटेश जाधव, लक्ष्मण नाईक, संजय पाटील, शिवाजी शेट्टी, राहुल होनगेकर, संजय कुगजी, विजय पाटील, मारुती राजगोळकर, प्रवीण पाच्छापुरी, महादेव देसाई, जोतिबा केदारी, तानाजी पाटील, सोमू देसाई, शिवानंद मराठे व व्यापारी बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.









