गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालय आवारातील हनुमान मंदिरमध्ये हनुमान जयंती उत्सव सोहळा मोठ्या भक्तीमय वातारणात झाला
कोल्हापूर प्रतिनिधी
गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय आवारातील हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती मंगळवारी मोठया भक्तीमय वातावरणात झाली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते हनुमान मूर्तीचे पूजन झाले. त्यानंतर संघाचे संचालक बाबासाहेब चौगले व त्यांच्या पत्नी विजयमाला चौगले यांच्या हस्ते उत्सवमूर्तीस रूद्र अभिषेक व इतर धार्मिक विधी करण्यात आले. हनुमान जन्मकाळा सोहळ्यानंतर भजन व विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, अंबरिषसिंह घाटगे, बाळासाहेब खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, अमृता डोंगळे, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक एस.व्ही. तुरंबेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, अशोक पाटील, बाजीराव पाटील, निवास पाटील, बाळासो वायदंडे, संकेत खाडे, मानसिंग खाडे, विनोद पाटील, बाळासो खांडेकर आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









