प्रतिनिधी/ फोंडा
वारखंडे-फोंडा येथील श्री हनुमान देवस्थानात 5 एप्रिलपासून हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त बुधवार 5 रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला रात्री 8.30 वा. राजदीप नाईक प्रस्तूत कला चेतना वळवई निर्मित कोकणी नाटक ‘काणी नव्या युगाची’ सादर होणार आहे. गुरुवार 6 रोजी पहाटे हनुमान जन्म, दुपारी 1.30 वा. श्रींची पालखीतून मिरवणूक, रात्री भजन, आरती, तिर्थप्रसाद व रात्री 10.30 वा. इम्पर्फेक्टबनी प्रस्तूत रुद्र क्रिएशन्स निर्मित कोकणी नाटक ‘तेंगशेर कावळो घोवाक दुवाळो’ व शुक्रवार 7 रोजी रात्री भजन, आरत्या, तिर्थप्रसाद, पावणी व रात्री 10.30 वा. श्री नागेश महारुद्र संस्थान निर्मित प्रशांत सतरकर प्रस्तूत ‘भविष्यमान भव’ कोकणी नाटक सादर होणार आहे असे वारखंडेकर मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.









