क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
एसकेई सोसायटीच्या आयोजित पाचव्या हनुमान चषक 16 वर्षांखालील आंतरशालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा सोमवार दि. 10 नोव्हेंबरपासून प्लॅटिनम ज्युबली मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत एकूण 18 आंतरशालेय संघांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, आनंद चव्हाण, एसकेई स्पोर्टस कमिटीचे चेअरमन आनंद सराफ, स्पर्धा पुरस्कर्ते आनंद सोमण्णाचे, दीपक पवार, अमर सरदेसाईसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर स्पर्धेतील 18 संघ 6 गटात विभागण्यात आले असून अ गटात ठळकवाडी हायस्कूल, शांतिनिकेतन खानापूर, केएलई अथणी, ब गटात सेंट झेवियर्स, केएलएस, बी. एन. खोत बागलगोट, सी गटात लव्हडेल, इंडस अल्टम, केएलई अंकली, बी गटात केएलई इंटरनॅशनल, महिला विद्यालय, आर्मी पब्लिक स्कूल, ई गटात गजाननराव भातकांडे, ज्ञान प्रबोधन, केएलई इंटरनॅशनल ब, एफ गटात एम. व्ही. हेरवाडकर, वनिता विद्यालय व ज्योती सेंट्रल स्कूल यांचा समावेश आहे. उद्घाटनाचा सामना केएलई इंटरनॅशनल व महिला विद्यालय यांच्यात 9 वाजता खेळविला जाणार आहे. तर दुपारी गजाननराव भातकांडे विरुद्ध केएलई इंटरनॅशनल ब यांच्यात 1.30 वा. होईल.









