महिला दिनी फोंडा पोलिस स्थानकात एकवटली नारीशक्ती
प्रतिनिधी / फोंडा
कसयले, तिस्क-उसगांव येथे बेपत्ता झालेल्या एका 4 वर्षीय चिमुकल्या मुलीचे डोके पाण्याने भरलेल्या बाथ टबमध्ये बुडवून निर्घृण खून केलेल्या ‘त्या’ संशयित दांपत्याला कायमची अद्दल घडविण्यासाठी फाशीची शिक्षा द्या! पोलिसांनी तपास करताना अनेक पुराव्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे. मूल नसल्याने अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळेच संशयित दांपत्याने 4 वर्षीय निष्पाप मुलीचा बळी घेतल्याचा आरोप महिला दिनी फोंडा पोलिस स्थानकावर एकवटलेल्या महिला व पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
काल शनिवारी जागतिक महिलादिनी मोठ्या संख्येने कसयले येथे जमलेल्या महिलांनी निष्पाप बळी गेलेल्या मुलीच्या त्या मातेचे सांत्वन केले. त्यानंतर फोंडा पोलिस स्थानकात धडक देत याप्रकरणी अंधश्रद्धेच्या अनुषंगाने तपासाची गती वाढवून सखोल तपास करावा, अशी जोरदार मागणी फोंडा पोलिसांकडे केली आहे. शवचिकित्सा अहवालातून 4 वर्षीय निष्पाप मुलीचा बाथ टबमध्ये पाण्यात बुडवून बळी घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे. या अहवालावरच अवलंबून न राहता त्या दोघाही संशयितांना कठोर शिक्षा देण्यासाठी अंधश्रद्धेच्या कोनातूनही तपास होणे गरजेचे असल्याचे मत जमावाने मांडले. मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोघाही संशयित दांपत्याची शुक्रवारी फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने 6 दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. यावर संतप्त जमाव समाधानी नसून त्यांना फाशीची कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा करून सखोल तपास करावा, अशी मागणी होत आहे.
दाम्पत्याला फाशीची शिक्षा द्या !
अमायरा या 4 वर्षीय निष्पाप मुलीच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित म्हणून अवघ्या 50 मिटर अंत रावरील शेजारच्या पती-पत्नी बाबासाहेब उर्फ पप्पू अलहड (52) व पूजा अलहड (40) मूळ महाराष्ट्र रा. कसयले यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. अमायरा ही बुधवार 5 मार्च रोजी दुपारनंतर आपल्या आजीच्या घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर 6 रोजी उशिरा रात्री दांपत्याला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी जबानी नोंद केल्यानंतर अनेक दडलेल्या गोष्टींचा उलगडा होणार आहे.
योग्य दिशेने तपास करावा
निष्पाप मुलीचा बळी घेतलेल्या दांपत्याला फाशीची शिक्षा द्या तसेच अंधश्रद्धेच्या कोनाची शक्यता असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे असल्याने तपासाची चक्रे गतिमान करून पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा, अशी मागणी नागरिकांसमवेत सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर तसेच उसगाव गांजेच्या पंचसदस्य मनीषा उसगावकर आणि अमायराच्या पीडित कुटुंबीयांनी केली आहे.
त्यांनी फोंड्याच्या पोलिस निरीक्षकांशी भेट घेतली. संशयितांना अ़ंधश्रद्धेची फुस लावणाऱ्या मास्टरमाईंडचा शाध घ्यावा. महिला सबलीकरणाच्या मोठी आश्वासने देणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच मंत्री विश्वजित राणे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संशयितांना कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनीषा उसगावकर यांनी यावेळी केली.
मुलीच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित म्हणून अवघ्या 50 मिटर अंत रावरील शेजारच्या पती-पत्नी बाबासाहेब उर्फ पप्पू अलहड (52) व पूजा अलहड (40) मूळ महाराष्ट्र रा. कसयले यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. अमायरा ही बुधवार 5 मार्च रोजी दुपारनंतर आपल्या आजीच्या घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर 6 रोजी उशिरा रात्री दांपत्याला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी जबानी नोंद केल्यानंतर अनेक दडलेल्या गोष्टींचा उलगडा होणार आहे.









