Handwriting competition, book exhibition held at Madura Library.
श्रीमती बनुताई पै ग्रंथालय व संस्कार केंद्र, मडुरा ग्रंथालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ घेण्यात आली. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे तिचे संरक्षण व संवर्धन ही आपली जबाबदारी आहे मुलांना मराठी भाषेची ओळख, मराठी साहित्याची जाण,मराठी भाषेशी जवळीक निर्माण करून देण्याची जबाबदारी आपलीच आहे.सर्वच लोकांचे हस्ताक्षर चांगले असतेच असे नाही, हस्ताक्षर ही एक कला असून सर्वांना ती सहज आत्मसात करता येऊ शकते. मुलांमध्ये मराठी हस्तलेखनाची आवड निर्माण व्हावी व स्वच्छ, सुवाच्य हस्तलेखनाचे महत्त्व त्यांना कळावे ,यासाठी ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला बालवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासोबतच ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन ठेवण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सदस्य श्री. कृष्णा करमळकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सौ. माधुरी वालावलकर, सुवर्णा मडुरकर, बाळकृष्ण प्रभु, मेघनाथ पंडित ,यशोदा मडुकर स्नेहल सामंत, मनिषा भोगले उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी