सांगली / संजय गायकवाड :
सांगलीचे प्रवेशद्वार आणि शहरातील प्रमुख चौक म्हणून नोंद असलेल्या शास्त्री चौकाला हातगाडयांनी विळखा घातला आहे. या चौकातील अतिक्रमणे कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहेत. वाढत्या अतिक्रमणामुळे या चौकातून मध्यवर्ती बसस्थानकाकडे एसटी गाडया वळताना अडचणीचे होत आहे. त्यामुळे छोटे मोठे अपघातही होत आहेत. आयुक्त सत्यम गांधी यांनी शास्त्री चौकातील अतिक्रमणे हटवून या चौकाला शिस्त लावण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
शास्त्री चौक हा सांगलीतील महत्वाचा चौक आहे. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्हयातील सर्वच डेपोच्या एसटी बसेस या चौकातून सांगलीच्च्या मध्यवर्ती बसस्थानकडे येत असतात. त्याशिवाय दर पंधरा मिनिटाला सुटणारी सांगली कोल्हापूर व सांगली इचलकरजी या मार्गावरील एसटी बसेस, जयसिंगपूरकडून येणारी सर्व वाहने आणि बायपास रोडने येणारी सर्व वाहने यान चौकातून सांगलीत प्रवेश करतात असतात. सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकातून मिनिटाला एक तर बस बाहेर पडते. त्यात कोल्हापूरच्या दिशेला जाणाऱ्या व तिकडून येणाऱ्या एसटी बसेसची संख्या विचारात घेतली तर शास्त्री चौक व हरिपूर रोड या भागात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
सांगलीकडून कोल्हापूरच्या दिशेला जाणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या वाहनांना शास्त्री चौकातूनच पुढे जावे लागते. त्यामुळे या चौकात दिवसरात्र वाहनांची ये जा सुरू असते. विशेषतः एसटी बसेस, खासगी आरामगाड्या, रिक्षा, कंटेनर, टैंकर मालमोटारी, फळ मार्केटकडे जाणारे छोटा हती अशा गाड्यांचे प्रमाण जास्त आहे.
शास्त्री चौकाला मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसेससह गावभाग, शिवाजी मंडईकडून येणारा व जाणारा रस्ता, झुलेलाल चौकातून पुढे गेलेला सिव्हिल रस्ता आणि हरिपुर रस्ता असे अनेक रोड या चौकाला येऊन मिळतात. या चौकाला कोणत्याही प्रकारची ! शिस्त नाही. वाहनचालक कशाही गाडया पळवितात, विशेषतः गावभाग आणि रणझुंझार चौकाकडून येणारे वाहनचालक वाहतुकीचे कोणतेही नियम पाळत नाहीत.
त्यामुळे या बौकात हमखास अपघात होतात. हरिपूरकडे जाणाऱ्या वाहनांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही वाहनेही भरधावपणे पुढे जाण्याना प्रयत्न करतात. त्यामुळेही अपघात होतात.
शास्त्री चौकात ट्रैफिक सिग्नल बसवूनही काही उपयोग होणार नाही. मुळातच हा चौक खूपच लहान व असंद आहे. शिवाय या चौकात चारही बाजूंनी हातगाडया मोठ्या प्रमाणात उभ्या असतात. त्यामुळे शास्त्री चौकातून अवजड वाहने आणि एसटी बसेस वळू शकत नाहीत. त्यामुळे शास्त्री चौकातील हातगाड्या, फेरीवाले यांचे अतिक्रमण हटविण्याची आवश्यकता आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे या नौकानी दयनीय अवस्था झाली आहे. सांगलीमध्ये महापालिका झाल्यापासून अपवाद वगळता रस्ता रुंदीकरण झालेले नाही. अनेक रस्त्यांच्या रूंदीकरणाचे प्रस्ताव पडून आहेत, वाढत्या अतिक्रमणामुळे सांगलीतील सिव्हिल रोडसह अनेक रस्त्यावर अपघात होवून लोकांचे बळी जात आहेत. गेल्या पंधरा दिवसामध्ये सिकिल रोडवर बस अपघातात एका युवतीसह दोघांचा तर बायपास रोडवर बस आणि दुचाकीच्या अपघातात दोघा युवकांचा बळी गेला आहे. महिन्याभरात सांगलीतील प्रमुख ठिकाणी झालेल्या अपघातात चौघांचा नाहक बळी गेलेला आहे. शास्त्री चौकातही अतिक्रमणामुळे कधीही मोठा अपघात होवू शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगलीतील शास्त्री चौकच नव्हे तर सर्वच चौक आणि रस्त्यांना आढावा घेवून शहरातील रस्ते आणि चौक अतिक्रमणाच्च्या विळख्यातून मुक्त करून चौकांना मोकळा श्वास घेण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
- शास्त्री चौकाचे सुशोभिकरणही आवश्यक
शास्त्री चौक हा सांगलीतील प्रमुख नौक आहे. कोल्हापूरकडून सांगलीमध्ये प्रवेश करताना हा चौक लागतो. पण या चौकाची अवस्था पाहिल्यानंतर लोकांना वाईट वाटते. एका बाजूला घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रशस्त पुतळा आणि हा परिसर चांगला झालेला असताना समोरील चौक मात्र अतिशय अरुंद आणि हातमाइयांचा विळखा असे नित्र लोकांना पहावे लागते. त्यामुळे बाबासाहेबांच्या पुतळ्याबरोबरच शास्त्री चौकाचेही सुशोभिकरण केल्यास हा परिसर आणखी चांगला दिसेल, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कोल्हापूर रोडच्या सुधारणेबरोबरच चौक सुशोभित करण्यासाठी निर्णय घ्यावा अशी शहरवासियांतून मागणी होत आहे.








