Beauty Tips : आपण चेहऱ्य़ाची जशी काळजी घेतो. तशीच काळजी हाताची आणि पायाची घ्यावी लागते. यासाठी आपण पार्लरला जावून मेनिक्युअर-पेडिक्युअर करतो. किंवा व्हॅक्सिंग करतो. मात्र प्रत्येकवेळी आपल्याला इतके पैसे खर्च करणे शक्य होत नाही. किंवा कामामुळे पार्लरला जाणं शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही घरातील किचनमधील साहित्याचा वापर करून हात-पायाचे पाॅलिश करू शकता. य़ासाठी फार वेळ द्यावं लागत नाही. अगदी तासाभरात तुम्ही हाताचे आणि पायाचे टॅनिंग दूर करू शकता. यासाठी बेसिक तिन स्टेप आहेत त्या तुम्ही फाॅलो करा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. चला तर जाणून घेऊया.
साहित्य
बटाट्याचा रस
साखर
मसुर डाळीच पीठ
तांदळाचं पीठ
दही
लिंबू,
मध
कृती
सुरुवातीला हात स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ३ चमच्या बटाट्याच्या रसात १ चमचा मध घालून मिक्स करून घ्या. हे मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर त्यात काॅटन बुडवून संपूर्ण हाताला लावून घ्या. दंडाला, काखेत, कोपऱ्याला लावून घ्या. त्यानंतर १० मिनिटे वाळवा.
स्टेप नंबर दोन
बटाट्याचा रस लावून झाल्यानंतर ३ टिस्पून साखरेत अर्धा लिंबू आणि एक चमचा मध घालून चांगले मिक्स करून घ्या. त्यातील साखर विरघळता कामा नये. त्यानंतर संपूर्ण हाताला स्क्रब करून घ्या. त्यानंतर थंड पाण्याने हात धुवून घ्या. त्यानंतर हात कोरडा करून घ्या. यामुळे टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
स्टेप नंबर तीन
स्क्रबिंग झाल्यानंतर आता लेप लावायचा असतो. यासाठी २ चमचे मसुर डाळीच्या पीठात २-३ थेंब लिंबू पिळून घ्या. त्यात १ चमचा तांदळाचं पीठ घाला. त्यामध्ये एक चमचा दही घाला. आता हे मिश्रण एकजीव करून घ्या. हा लेप बनवत असताना लेप पातळ बनवू नका. लेप बनवत असताना त्यामध्ये गुलाबपाणी किंवा साध पाणी वापरू शकता. गरजेनुसार तुम्ही यातील साहित्य वाढवून लेप जादा करू शकता.
टीप-
हाताचं किंवा पायाचे पाॅलिशिंग आठवड्यातून एकदा करा. तुम्ही एक दिवस आड स्टेप नंबर दोन करू शकता. हे करताना वय वर्ष १८ च्य़ा पुढील मुलींपासून अगदी ८० वर्षाच्या महिला देखील करू शकतात. तसेच ज्यांची स्किन अतिशय ड्राय आहे त्यांनी माॅश्चराईझर करावं. सर्वच स्किन टाईपनी देखील माॅश्चराईझ केलं तरी चालतं. तुम्हाला नक्कीच फायदा होतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









