वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
आशियाई क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळमध्ये भारताच्या विदित गुजराथीला वैयक्तिक विभागात दुसऱ्या फेरीत कझाकच्या काझीबेक नोगेबेककडून पराभवाचा धक्का बसला. महिला विभागात कोनेरू हंपी व डी. हरिका यांनी मात्र पहिल्या दोन फेऱ्यांत विजय मिळविले.
गुजराथीने पहिल्या फेरीत बांगलादेशच्या मोहम्मद फहाद रहमानवर विजय मिळवित चांगली सुरुवात केली. पण दुसऱ्या फेरीत त्याला कझाकच्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला. अर्जुन इरिगेसीने दोन फेऱ्यानंतर 1.5 गुण मिळविले आहेत. त्याने पहिल्या फेरीत फिलिपाईन्सच्या पावलो बर्सामिनाचा पराभव केला तर दुसरा सामना अनिर्णीत राखला.









