साटेली भेडशी प्रतिनिधी
मागील आठवड्यात काही जागरूक सामाजिक कार्यकर्ते ,नागरिकांनी साटेली भेडशी येथील एका अनधिकृत इमारतीमध्ये अवैद्यपणे हत्यारे बाळगल्याची बाब उघडकीस आणली होती. त्यानंतर यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करत संबंधितावर गुन्हा दाखल केला होता .सोमवारी सकाळी संबंधित ती अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात आली.









