वृत्तसंस्था/ हॅमबर्ग, जर्मनी
आर्थर फिल्सने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या कॅस्पर रुडचा पराभव करून सध्या सुरू असलेल्या हॅमबर्ग युरोपियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली मारली. फिल्सने ऊडचा 6-0, 6-4 असा पराभव करत आघाडीच्या 20 खेळाडूंमधील प्रतिस्पर्ध्यावर प्रथमच विजय मिळवला. 19 वर्षीय खेळाडूने त्याच्या फोरहँडचा प्रभावी वापर केला आणि 78 मिनिटांच्या सामन्यात आपली शक्ती आणि अचूकता दाखवली.
फ्रेंच खेळाडूचा पुढचा प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्ह असेल, ज्याने लुका व्हॅन अॅशेला 89 मिनिटांत 6-3, 6-4 ने पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी नाकारली. दोन वेळा एटीपी फायनल विजेता राहिलेल्या अलेक्झांडरने दोन स्थानांची वाढ साध्य केली असून ‘एटीपी लाइव्ह रँकिंग’मध्ये तो दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
दुसरीकडे, लॉरेन्झो मुसेट्टीला लास्लो जेरेकडून पराभव स्वीकारावा लागल्याने या स्पर्धेचा किताब राखण्याचे त्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे. जागतिक क्रमवारीत 57 व्या स्थानावर असलेल्या सर्बियन खेळाडूने मुसेट्टीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. जेरेचा पुढचा प्रतिस्पर्धी झांग झिझेन असेल, ज्याने डॅनियल ऑल्टमायरविऊद्ध 6-4, 6-4 असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे.









