पीओकेत जैश अन् एलईटीला साथ : सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद फैलावण्यासाठी दहशतवादी संघटना एकजूट होताना दिसुन येत आहेत. पीओकेत लवकरच एक कार्यक्रम होणार असून यात हमासचा टॉप कमांडर सामील होणार असल्याचे गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या आयोजनात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी सामील होतील आणि यात हमासचा प्रवक्ता खालिद कद्दूमी भाषण करणार आहे. पाकिस्तान आता जैश आणि एलईटीसोबत हमासच्या साथीने जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करू पाहत आहे.
पाकिस्तान याच्या माध्यमातून काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयकरण करू पाहत आहे. पॅलेस्टाइन आणि काश्मीर एकसारखे मुद्दे असल्याचा संदेश यातून देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. तुर्किये, मलेशिया यासारख्या देशांनी अनेकदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून भारताविरोधात टिप्पणी केली आहे, परंतु सौदी अरेबिया, युएई आणि कतार, कुवैत यासारख्या देशांनी पाकिस्तानच्या दुष्प्रचाराला नाकारले आहे. पीओकेत होणाऱ्या आयोजनाला अल अक्सा फ्लडच्या बॅनर अंतर्गत आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते. याचे नावाने 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. या हल्ल्यांमध्ये सुमारे 700 जण मारले गेले होते. तर शेकडो जणांचे हमासने अपहरण केले होते. अल-अक्सा ही जेरूसलेम येथील मशिद असून त्यावर मुस्लीम आणि ज्यू धर्मीय दावा करत असतात.









