वृत्तसंस्था / तेल अवीव
हमासच्या ताब्यात सध्या इस्रायलचे 47 ओलीस असून ते सर्व सुस्थितीत आहेत, असे दर्शविणारा व्हिडीओ हमासकडून प्रसारित करण्यात आला आहे. या ओलीसांची परिस्थिती काय आहे, हे कळू शकत नाही, असे प्रतिपादन इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांनी केले होते. तसेच ते सर्व सुरक्षित आहेत की नाहीत, याविषयी शंका उपस्थित केली होती. त्यामुळे आम्ही हा पुरावा प्रसिद्ध करत आहोत, असे प्रत्युत्तर हमासने दिले आहे. या सर्व ओलीसांनी आम्ही गाझा शहराच्या आसपास विखरुन ठेवले आहे. इस्रायलने गाझा शहरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात हे ओलीस मारले गेल्यास आम्ही त्यासाठी उत्तरदायी असणार नाही, असे हमासच्या काही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. इस्रायल सध्या गाझा शहरावर ताबा मिळविण्यासाठी सैनिक कार्यवाही त्या शहरावर करीत आहे.









