अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट : पहिल्यांदाच सर्व संचालक बिनविरोध, जोल्ले दाम्पत्याच्या नावाचा जयघोष
वार्ताहर /निपाणी
हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 16 रोजी होणार होती. या निवडणुकीसाठी फक्त सत्ताधारी गटाकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. 20 जागांसाठी 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने संचालकपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खासदार आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ताधारी गटातून अर्ज दाखल केलेल्या अतिरिक्त 12 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मागे घेतले. यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. कारखान्याच्या स्थापनेपासून ही 8 वी निवडणूक जाहीर झाली होती. यापूर्वीच्या सर्वच निवडणुका चुरशीने लढल्या गेल्या. पण यंदाची निवडणूक मात्र कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध झाली.
आप्पासाहेब शिवराम जोल्ले-एकसंबा, अविनाश आण्णासाहेब पाटील-एकसंबा, जयकुमार आप्पासाहेब खोत-शमनेवाडी, जयवंत गंगाराम भाटले-निपाणी, मल्लगोंडा पिरगोंडा पाटील-जत्राट, पवनकुमार महावीर पाटील-मांगूर, प्रकाश राजाराम शिंदे-भिवशी, रामगोंडा बाळगोंडा पाटील-जनवाड, रमेश महादेव पाटील (खेमाण्णा)-बेनाडी, रावसाहेब दत्तू फराळे-अकोळ, समित बाबासाहेब सासणे-पडलिहाळ, शरद बाळासाहेब जंगटे-बोरगाव, सुकुमार बाबुराव पाटील-बुदिहाळ, विनायक रामगोंडा पाटील-रामपूर, विश्वनाथ सदाशिव कमते-खडकलाट अशी सामान्य ऊस उत्पादक गटातून निवडलेल्या संचालकांची नावे आहेत.
एससी एसटी गटातून सुहास सिद्धराम गुगे-अकोळ, महिला गटातून गीता सुनील पाटील-निपाणी, वैशाली किरण निकाडे-कुर्ली, ओबीसी गटातून श्रीकांत चौंडाप्पा बन्ने-गळतगा, बिगर ऊस उत्पादक गटातून राजू ऊर्फ राजेंद्र शांतीलाल शाह (गुंदेशा)-निपाणी यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या निवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. कारखान्याने अवघ्या चार वर्षांत खासदार आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची दिशा धरली आहे.









