South Korea Stampede : दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेयूलमध्ये चेंगराचेंगरीत 149 जणांचा मृत्यू झाला आहे , तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.तर 50 जणांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे.हॅलोवीन फेस्टीवलच्या (Halloween Festival) कार्यकमात ही घटना घडली आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. याप्रकरणी राष्ट्रपती यूं सुक-येओल यांनी योंगसान-गु जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद पथकाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनानंतर दोन वर्षानंतर हॅलोवीन फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टीवलमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती.जवळपास एक लाख लोक या ठिकाणी जमले होते. ज्या ठिकाणी घटना घटली त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट उभा करण्यात आला होता.गर्दीमुळे गुदमरून लोक रस्त्यावरच बेशुध्द पडले. आरोग्य यंत्रणेकडून आपत्कालीन सेवांद्वारे रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
कशी घडली घटना ?
दक्षिण कोरियातील सियोलमध्ये हॅलोवीन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं.त्या कार्यक्रमात एका ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता.सेल्फी पॉईंटजवळी सेल्फी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आणि त्यांचं रुपांतर चेंगराचेंगरीत झाल्याची माहिती समोर आली आहे.या चेंगराचेंगरीत 149 जणांचा मृत्यू झाला आहे , तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.तर 50 जणांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









