दिल्ली / प्रतिनिधी
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने आगामी LCA तेजस मार्क 1A साठी 20 विविध प्रकारच्या प्रणालींचा विकास आणि पुरवठ्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत करार केला आहे.
2023 ते 2028 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या 2,400 कोटी रुपयांच्या ऑर्डरवर गुरुवारी स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार BEL क्रिटिकल एव्हियोनिक लाइन बदलण्यासाठीचे युनिट्स (LRU) पुरवठा करेल. हे LRU तेजस विमानात वापरले जाणारे मॉड्यूलर प्रणाली असून HAL सध्या 76 कंपन्यांकडून 344 LRU मिळवत आहे, त्यापैकी 49 आंतरराष्ट्रीय कंपन्या तेजस फायटरच्या सध्याच्या आवृत्त्यांसाठी 134 एलआरयू पुरवत आहेत.
BEL ने सांगितले की नवीन करारांतर्गत, ते डिजिटल फ्लाइट कंट्रोल कॉम्प्युटर, एअर डेटा कॉम्प्युटर, वेपन कॉम्प्युटर, रडार वॉर्निंग रिसीव्हर (RWR) आणि हेडअप डिस्प्लेशी संबंधित LRUs ची पुरवठा करणार आहे. या प्रणालींची रचना आणि विकास एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, डीआरडीओ लॅब्स, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, कॉम्बॅट एअरक्राफ्ट सिस्टम्स डेव्हलपमेंट अँड इंटिग्रेशन सेंटर आणि सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन यांनी केली आहे.
या प्रणालींच्या पुरवठ्याचे आदेश भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या बेंगळूर आणि पंचकुला (हरियाणा) या दोन विभागांद्वारे अंमलात आणले जातील. सर्व करार केलेल्या वस्तू BEL द्वारे HAL ला रेडी-टू-बोर्ड स्थितीत वितरित केल्या जातील. एचएएलचे सीएमडी आर. माधवन यांनी मेक-इन-इंडिया कार्यक्रमासाठी “शॉट-इन-द-आर्म” असे ऑर्डरचे वर्णन केले आहे. 2023-24 पासून IAF ला 83 तेजस Mk1A ऑर्डर अंतर्गत वितरण सुरू होईल.