तरुणभारत ऑनलाइन टीम
प्रत्येकालाच लांबसडक, घनदाट आणि चमकदार केस हवे असतात. यासाठी तुम्ही केसांवर महागडे उपचार देखील घेतो. आजकाल केसांची समस्या तर सामान्य बनली आहे. पण जर केसांवर घरच्याघरी थोडी मेहनत घेतली तर याचा नक्की उपयोग होऊ शकतो.त्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती हेअर मास्क कसे बनवायचे आणि कसे वापरायचे हे सांगणार आहोत.ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
१. कोरफड आणि दह्याचा हेअर मास्क
ताजी कोरफड जेल आणि दही हे समप्रमाणात घ्या. एकत्र मिसळा. हे मिश्रण आपल्या केसांना लावा. 30 अथवा 40 मिनिट्स झाल्यानंतर साध्या अथवा थंड पाण्याने धुवा. ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून केल्यांनतर कोरड्या केसांच्या समस्येपासून तुमची सुटका होईल.
२. केळ्यांचा हेअर मास्क
केळ्याचा हेअर मास्क केसांना हेल्दी आणि आकर्षक बनवतो. हा मास्क बनवण्यासाठी दोन केळी मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या आणि त्यात 2 मोठे चमचे दही, ऑलिव्ह ऑईल आणि मध घालून मिक्स करा. हा मास्क तुमच्या मुळापासून केसांवर व्यवस्थित लावा आणि मग डोक्यावर शॉवर कॅप लावून कव्हर करा. अर्धा अथवा एक तासाने तुम्ही शँपू करा.
३. कोरड्या केसांसाठी ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल हे कोरड्या आणि खराब केसांसाठी चांगला उपचार आहे. आपले केस नीट धुवून घ्या आणि टॉवेलने सुकवा. थोडं ऑलिव्ह ऑईल गरम करा आणि केसांच्या मुळापासून लावा. अर्धा तास तसंच ठेवा आणि मग परत शँपूने धुवा.यामुळे केसांची वाढ होईल.
४.अंड्याचा हेअर मास्क
एका भांड्यात अंड्याचा बलक त्यात एक चमचा एरंडाचं तेल, एक चमचा मध मिसळून हा हेअर मास्क तयार करून केसांना लावा. आता केस अगदी मुळापासून कव्हर करून घ्या. एक प्लास्टिक कॅप तुमच्या डोक्यावर ठेवा आणि त्यावर टॉवेल लावा. आता अर्धा तास झा्ल्यावर केस धुवा आणि मग अॅप्पल सायडर व्हिनेगर लावून केस धुवा. चांगल्या परिणामासाठी हा मास्क आठवड्यातून दोनवेळा अथवा तीन वेळा करा. तुमचे केस नक्कीच चमकदार होतात.
५. नारळ तेल हेअर मास्क
केसांसाठी नारळाचं तेल एक वरदानच असतं. याचं तेल घेऊन केलेला हेअर मास्क हा सर्वात फायदेशीर असतो. यासाठी तुम्ही एक चमचा नारळाचं तेल घेऊन भांड्यात गरम करून घ्या. थोडं थंड झाल्यावर तुम्ही मुळांपासून केसांना हे तेल लावा आणि मालिश करा. आपल्या केसांना त्यानंतर गरम टॉवेलने लपेटून घ्या आणि १ तासानंतर टॉवेल सोडा. त्यानंतर सॉफ्ट शँपूने केसा धुवा आणि मग सुकवा. हा मास्क तुम्ही नेहमी वापरलात तर तुमच्या कोरड्या केसांची गेलेली चमक परत येईल आणि तुमचे केस घनदाट होण्यास मदत होईल.