अर्चना बनगे, प्रतिनिधी
Curry Leaves On Hair : कढीपत्ता आपण रोज जेवणात वापरतो. कढीपत्त्याचा वापर खाण्यामध्ये टेम्परिंग करण्यासोबतच सौंदर्य वाढवण्यासाठीही केला जातो.विशेषत:केस मजबूत आणि घट्ट होण्यासोबतच केस चमकदार बनवण्यासाठी कढीपत्ता मदत करतो.आयुर्वेदात कढीपत्त्याला औषधाचा दर्जा देण्यात आला आहे.कढीपत्त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.जे फ्री रॅडिकल्स कमी करतात.त्यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहतात.केस गळणे आणि पातळ होण्याने त्रास होत असेल तर महागड्या रासायनिक प्रोडक्ट ऐवजी कढीपत्ता वापरा.हेअर मास्क किंवा तेलात कढीपत्ता मिसळून केसांना लावा.तुम्हाला निश्चितच फायदा याचा होईल. हे हेअर मास्क आणि कढीपत्ता तेल कसे बनवायचे ते जाणून घेऊया.
असे बनवा हेअर मास्क
कढीपत्त्याचा हेअर मास्क बनवून केसांना लावल्याने केस दाट आणि मजबूत होतात. यासोबतच केसांमध्ये नैसर्गिक चमकही येते.हेअर मास्क बनवण्यासाठी कढीपत्ता बारीक करून पेस्ट बनवा.नंतर ही पेस्ट दह्यात मिसळा. आता तयार पेस्ट केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांना हलक्या हाताने लावून घ्या. हळूवार मसाज करा आणि अर्धा तास तसेच राहू द्या. त्यानंतर केस शॅम्पूने धुवा.आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क लावल्याने केस चमकदार आणि मजबूत होतात.कढीपत्त्याचा मास्क लावल्याने डेड स्किन निघून जाऊन कोंडा देखील साफ करते आणि केसांच्या मुळांना हायड्रेट करते.त्यामुळे केस सुंदर आणि बाउंसी दिसू लागतात.
कढीपत्त्याने बनवा केसांचे टॉनिक
केस मजबूत करण्यासाठी टॉनिक म्हणून कढीपत्ता वापरा. खोबरेल तेलात कढीपत्ता मिसळून लावल्याने केस गळणे कमी होते.
असे बनवा तेल
गॅसवर एक छोटे पातेले ठेवा. त्यामध्ये खोबरेल तेल आणि थोडा कडीपत्ता घाला. पाने तेलात शिजल्यावर गॅस बंद करा. आता तेल थंड झाल्यावर ते एका बाॅटेलमध्ये भरून घ्या. आता हे तेल केसांच्या मुळांपासून लावून घ्या. सुमारे एक तास असेच राहू द्या आणि नंतर शाम्पूने केस धूवून घ्य़ा.आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्याने केसांमधील फरक स्वतःच दिसून येईल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









