पुणे / प्रतिनिधी :
भारतीय हवामान विभागाने सोमवारी विदर्भाच्या काही भागात गारपिटीचा इशारा दिला आहे. याबरोबरच देशातील उष्णतेची लाट ओसरली असून, पुढील काही दिवस कमाल तापमान कायम राहणार आहे.
विदर्भ ते तामिळनाडू दरम्यान असलेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या मध्य प्रदेश व तेलंगणापर्यंत पसरला आहे. यामुळे राज्याच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात तुरळक पाऊस व विदर्भात गडगडाटी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातही विदर्भात सोमवारी गारपिटीची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील उन्हाचा कडाकाही कमी झाला असून, 39 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविण्यात आले आहे.
उष्णतेची लाट ओसरली
बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यात सुरु असलेली उष्णतेची लाट ओसरली असून, पुढील पाच दिवस कोठेही उष्णतेची लाट राहणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
अधिक वाचा : पुणे लोकसभा निवडणूक लढण्यास तयार; मा. आमदार मेधा कुलकर्णी यांची इच्छा








