वृत्तसंस्था/सिडनी
ड्रेसिंग रूममधील वादविवाद सार्वजनिक होऊ नयेत, असे ठामपणे सांगताना भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने गुऊवारी सांगितले की, त्याने खेळाडूंशी ‘प्रामाणिक’ संभाषण केले आहे आणि सध्याच्या संक्रमणामुळे संघ सर्वसमावेशक होईल. ड्रेसिंग रूममध्ये अस्वस्थता असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर मुख्य प्रशिक्षकाने त्या फक्त बातम्या आहेत, ते सत्य नाही, असे सांगून पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. काही प्रामाणिक शब्द सांगितले गेले एवढेच मी सांगू शकतो. तुम्हाला पुढे जायचे असेल आणि काही महान गोष्टी साध्य करायच्या असतील, तर प्रामाणिकपणा अत्यंत महत्वाचा आहे, असे गंभीरने कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांना सांगितले.









