डार्क साईडारॅन्समवेअर टोळ्यांपैकी एक असलेला डार्कसाइड हा हॅकर्स ग्रुप स्वत:ला ‘व्यावसायिक’ समजून ह्या ग्रुपने गेल्या तीन वर्षांत पाश्चात्य राष्ट्रांमधील कंपन्यांकडून अब्जावधी डॉलर्सची खंडणी गोळा केली आहे. हा ग्रुप पूर्व युरोपमध्ये कार्यरत असून एस्कटॉर्शन (खंडणी) मागण्यात माहिर आहे.
मे 2019 ला कलोनियल पाईपलाईन या तेल व वायु पुरवणाऱ्या अमेरिकेतल्या कंपनीच्या सर्व्हरवर जो हल्ला झाला, तो या ‘डार्क साईड ग्रुप’ने केला असे मानले जाते. अमेरिकेतील साधारण 90 कंपन्यांच्या डेटावर ताबा मिळवून, डाटा डिलिट करण्याची धमकी देऊन खंडणी मागण्याचा आरोप या हॅकिंग ग्रुपवर आहे. डार्क साईड हा देश व प्रांत व भाषा पाहून हल्ले करतात.
हा ग्रुप वैद्यकिय संस्था, शाळा व सामाजिक संस्था यांना कोणताही धोका पोहोचवत नाही. त्यांची काम करायची पद्धत थोडीशी निराळी आहे. ते जे रॅन्समवेअर/सॉफ्टवेअर तयार करतात ते पहिल्यांदा सिस्टीमचे लोकेशन काय आणि भाषा काय हे तपासतात व हल्ला करतात. याचे कारण की सोवियत देशातल्या म्हणजेच रशिया-युव्रेन इत्यादी देशांच्या सर्व्हरवर हल्ला होणार नाही याची दक्षता घेतात.
2020 साली पॅस्परस्की ह्या सिक्मयुरिटी कंपनीच्या नजरेत हा ग्रुप आला. डार्क साईडने स्वत:च्या वेबसाईटवर उघडपणे हॅकिंग संदर्भात गोष्टींची नोंद केली आहे आणि असा उल्लेख केला आहे की ज्या कंपन्यांकडे प्रचंड पैसे आहेत अशाच कंपन्यांकडे आम्ही खंडणी मागणार आहोत. हॉस्पिटल, शाळा, सामाजिक संस्था आणि सरकार यांच्यावर कोणतेही हल्ले करणार नाही. या ग्रुपने डिसेंबर 2020 ते 2021 या काळामध्ये अनेक हल्ले करून साधारण दोन मिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी कमाई केली. याच काळामध्ये अमेरिकेतील तेल आणि गॅस पुरवठा करणाऱ्या ज्या कंपनीत आहेत त्यांच्या सर्व्हरवर हल्ले करून त्यांनाही टार्गेट केले गेले.
द लिजन ऑफ डूम (थ्ध्अ- हॅकर लेक्स लुथर (रावण) ने त्याच्या आधीच्या हॅकिंग ग्रुप नाईट्स ऑफ शॅडो मध्ये झालेल्या मतभेदानंतर हा हॅकर ग्रुप स्थापन केला होता. थ्ध्अ 1980 पासून 2000 च्या दशकाच्या सुऊवातीस सक्रिय होता, परंतु 1984-1991 पर्यंत ह्या ग्रुपने सर्वात जास्त धुमाकूळ घातला होता आणि त्या वेळी जगातील सर्वात सक्षम हॅकिंग ग्रुप मानला गेला होता. आज, तंत्रज्ञानाच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली हॅकिंग ग्रुपपैकी एक म्हणून लीजन
ऑफ डूमचा क्रमांक लागतो.
1984 च्या उन्हाळ्यात, वॉरगेम्स चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक वर्षानंतर, एक कल्पना तयार करण्यात आली जी शेवटी संगणकाचा चेहरा कायमचा बदलेल. त्या काळातील सर्वात लोकप्रिय बुलेटिन बोर्डांपैकी एक न्यूयॉर्क राज्यातील प्लोव्हर-नेट नावाची प्रणाली होती, जी कोसी-मोटो म्हणवणाऱ्या व्यक्तीद्वारे चालवली जात होती. ह्याच वेळी ही सिस्टीम इतकी व्यस्त होती की बरेच वेळा त्याचे कॉल बंद किंवा ब्लॉक केले जात होते. ह्या प्लोव्हर-नेटमध्ये लेक्स लुथर हा काम करत होता. त्यावेळी फॉर्गो 4 ए, नाईट्स ऑफ शॅडो असे काही हॅकिंग ग्रुप कार्यरत होते. ‘लेक्स लुथर’ने नाईट ऑफ शॅडो जॉईन केला. या ग्रुपमध्ये काही नवीन लोकांनी कामाच्याबाबतीत सूचना केल्या मात्र त्या मान्य झाल्या नाहीत. या सूचना करण्यामध्ये लेक्स लुथरही होता. यामुळे काही मतभेद होऊन तो ह्या ग्रुपमधून बाहेर पडला. नंतर लेक्स लुथरने प्लोव्हर-नेटमधील व काही वैयक्तिक ओळखीच्या लोकांना एकत्र कऊन ‘द लिजन ऑफ डूम’ हा हॅकिंग ग्रुप सुऊ केला. लेक्स लुथर स्वत: बरोबर मार्क टॅबस, कार्ल मार्क्स, अग्रजग द प्रलोन्ज्ड, ऑटोमॅटिक जॅक असे साधारण 42 मेंबर कार्यरत होते. बांगलादेश ब्लॅक हॅट हॅकर्स उर्फ बीडी ब्लॅक हॅट्स हा बांगलादेशातील हॅकर गट आहे. 2012 मध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाने केलेल्या हत्या आणि टिपायमुख धरणाच्या बांधकामाचा बदला म्हणून भारतीय वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला होता. जेव्हा बांगलादेश ब्लॅक हॅट हॅकर्सने हे सायबर युद्ध घोषित केले, तेव्हा नंतर बांगलादेश स्थित आणखी दोन हॅकर गट बांगलादेश सायबर आर्मी आणि 3x 3 सायबर आर्मीदेखील त्यांच्यात सामील झाले.
कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नसताना या घटनेचे वर्णन सायबर युद्ध असे करण्यात आले आहे. हल्ल्याची धमकी 9 फेब्रुवारी 2021 रोजी देण्यात आली होती आणि 12 फेब्रुवारीपर्यंत 10,000 वेबसाइट हॅक झाल्याचा दावा करण्यात आला होता. नंतर ही संख्या 20,000 वर पोहोचली.
मार्च 2015 च्या सुमारास, बांगलादेशच्या इंग्लंडविऊद्धच्या क्रिकेट विजयाबद्दल नकारात्मक टिप्पण्यांमुळे, या गटाने शशी थरूर यांची वेबसाइट हॅक करण्याची जबाबदारीही घेतली. कोझी बिअर हा हॅकिंग ग्रुप ज्याला एटीपी29 देखील म्हणतात, हा रशियाच्या फॉरेन इंटेलिजेंस (एन्न्R) सर्व्हिससाठी काम करतो असे मानले जाते. हा ग्रुप 2008 सालापासून सक्रिय आहे. कोझी बिअरने आतापर्यंत युरोपमधील, नाटो अंतर्गत सरकारी संस्थांवर हल्ला केला असून त्या भागातील संशोधन संस्थांना लक्ष्य केले आहे. डेमोव्रॅटिक नॅशनल कमिटीच्या तडजोडीनंतर कोझी बिअरला प्रसिद्धी मिळाली.

अगदीच अलीकडे, सोलरविंड्स ह्या सप्लाई चेन हल्ल्याचे श्रेय एन्न्R ला देण्यात आले. या मोहिमेचे लक्ष्य व्यापक होते. त्यात तंत्रज्ञान, सरकार, दूरसंचार आणि युरोप, उत्तर अमेरिका, आशिया आणि मध्य पूर्वमधील इतर अनेक उद्योगांचा समावेश होता. तसेच, डेमोव्रॅटिक नॅशनल कमिटीवरील हल्ल्याच्या वेळी, असे मानले जात होते की कोझी बिअरने राज्य विभाग आणि युनायटेड स्टेट्स व्हाईट हाऊसला देखील लक्ष्य केले होते.
मार्च 2014 मध्ये, वॉशिंग्टन, डी.सी.-आधारित खाजगी संशोधन संस्थेच्या नेटवर्कमध्ये कोझी-ड्युक (ट्रोजन-कोझर) असल्याचे आढळून आले. ह्या ग्रुपने नंतर ऑगस्ट 2015 मध्ये पेंटागॉन त्यांच्या इमेल सिस्टीमवर हल्ला केला. जून 2016 मध्ये ह्यांच्या जोडीच्या पॅन्सी बिअर ह्या ग्रुपबरोबर डेमोव्रेटीक नॅशनल कमिटीच्या सर्व्हरवर हल्ला केला. सन 2017 मध्ये नॉर्वेच्या पोलीस सिक्मयुरिटी सर्व्हिसवर हल्ला केला तर त्याचवेळी ड्चच्या विविध मंत्रालयाच्या सर्व्हरवर हल्ला केला.
असे वाटत होते की कोझी-बिअर हा ग्रुप हा बंद झाला आहे मात्र झ्दत्ब्gत्दूअव, Rाgअव aह् इatअव असे तिन मालवेअर सापडले, जे ऑपरेशन गोस्ट नावाने सन 2019मध्ये कार्यरत होते व उलट ह्या ग्रुपने नवीन साधने विकसित केली आहेत जी शोधणे कठीण होते. जुलै 2020 मध्ये कोझी-बिअरने ऱ्एA, ऱ्ण्एण् आणि ण्एं ह्या यूके, यूएस आणि पॅनडामध्ये विकसित होत असलेल्या कोविड-19च्या लसी आणि उपचारांवरील डेटा चोरण्याचा प्रयत्नही केला होता.
तसे पाहिले तर असे डीसी-लिक्स, ड्रिप, डिजिटल ड्वागपाँड, एक्वेशन ग्रुप, फँसी-बिअर, गोस्ट स्वॅड हॅकर्स, ग्लोबल कोओएस, ग्लोबल हेल, गोटसेक (गोट सिक्मयुरिटी), हॅकवाईझर, हाँकर युनियन, इंटरनॅशनल सबवाइझर, आयटी आर्मी ऑफ युव्रेन, किलनेट, लॅझरस, मास्टर ऑफ डिसिप्शन, मिलवर्म, एनसिपीएच, आवरमाईन, पॉवरफुल ग्रिक आर्मी, रेडहॅट, रोकेट किटन, सँडवर्म, शॅडोब्रोक्रर, टेस्ला टीम, विझार्ड स्पायडर असे अनेक हॅकिंग ग्रुप कार्यरत आहेत जे जगामध्ये धुमाकूळ घालत आहेत.
-विनायक राजाध्यक्ष








