महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकुंबी : बेळगाव जिल्ह्यातील धार्मिक स्थळांबरोबरच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू माऊती मलप्रभा तीर्थक्षेत्र हे हजारो भाविकांचे श्र्रद्धास्थान असून एक जागृत देवस्थान म्हणून सध्या कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमेवरील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या देवस्थानवरील महाशिवरात्री उत्सवाला 86 वर्षांची परंपरा आहे. या देवस्थानवर आज आणि उद्या असे दोन दिवस महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श् ाdरी स्वयंभू मारुती देवस्थानला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. तर यावषीचा 86 वा महाशिवरात्रोत्सव आहे. आज व उद्या चालणाऱ्या या यात्रोत्सवात हजारो भाविक पवित्र मलप्रभा नदीत स्नान करून श्री स्वयंभू माऊतीचे दर्शन घेतात. यावेळी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसह रात्री संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थान मंडळाने भाविकांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
देवस्थानला 225 वर्षांचा इतिहास
दोनशे वर्षापूर्वी म्हणजे स्वातंत्रपूर्व कालखंडात हा परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला होता. त्यावेळी जनावरे चारवण्यासाठी आलेल्या एका गुराखी मुलाला नदीपात्रात 1807 मध्ये ही मूर्ती नजरेस पडली. हे ठिकाण हब्बनहट्टी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर झाडा-झुडपांमध्ये असल्याने या परिसरातील झाडे-झुडपे तोडून भक्तांनी पायवाट केली. हळूहळू भक्तांची गर्दी वाढत गेली. आणि जांबोटी भागातील एक श्र्रद्धास्थान म्हणून नावारूपाला येऊ लागले. या भागातील जनतेने 1921 मध्ये पहिला हनुमान जयंती उत्सव साजरा केला. त्यानंतर येथे महाशिवरात्री यात्रा भरविण्याचा निर्णय त्यावेळच्या जांबोटी संस्थानच्या परिसरातील कार्यकारी मंडळांनी घेतला. त्यानुसार 1937 मध्ये पहिली महाशिवरात्री यात्रा भरविली. देवस्थानवर कुस्ती आखाड्याचेही आयोजन करण्यात येत होते.
मठ आणि साधू परंपरा
देवस्थानची देखभाल करण्यासाठी एखादा स्वामी किंवा साधू असावा म्हणून मठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिले मठाधीश म्हणून म्हाळुंगे गावचे बुद्धाजी संत महाराज यांनी झोपडी बांधून त्या ठिकाणी वास्तव्य केले. त्या झोपडीचे मठात रूपांतर झाले. 1960 मध्ये मठासाठी कौलारू इमारत बांधली. इमारतीचा जीर्णोद्धार 1984 साली झाला. त्यानंतर धर्मशाळा व इतर इमारती बांधल्या. घाट बांधकाम, नदीपात्रातील स्वयंभू माऊतीचे मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, महादेव मंदिर अशी विविध कामे देवस्थान कमिटातर्फे हाती घेतली. त्यानंतर 1998 मध्ये मंगल कार्यालय इमारतीचे बांधकाम हाती घेतले. खानापूरचे तत्कालीन आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांनी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून समाजभवन बांधून दिले. अशाप्रकारे भाविकांच्या देणगीतून विविध विकासकामे हाती घेतली आहेत.
देवस्थानची धर्मादाय खात्यात नोंद
य् ाावषी देवस्थानची धर्मादाय खात्यात नोंद करण्यात आली आहे. देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मण कसार्लेकर आमटे तर उपाध्यक्ष म्हणून नानू गावडे हब्बनहट्टी, कार्याध्यक्ष नेताजी घाडी तर सेव्रेटरी म्हणून संतोष कदम व इतर 39 सदस्यांची कार्यकारी कमिटी स्थापन करण्यात आली आहे.









