वार्ताहर / कणकुंबी
बेळगांव जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या कणकुंबी भागात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने हब्बनहट्टी येथे मलप्रभा नदीत असलेले श्री स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली गेले आहे.
कणकुंबी भागात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस असल्याने परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच चिगुळे,पारवाड, चिखले,बेटणे आदी परिसरातील लहान-मोठे धबधबे पर्यटकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी बेळगाव परिसरांमधून अनेक पर्यटक दररोज कणकुंबी भागात येत असून पावसाचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.मात्र जांबोटी कणकुंबी भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतातील रोप लागवडीच्या कामामध्ये व्यस्त आहे. या भागातील शेतकऱ्यांना भाताची नटी लावण्याची धांदल लागलेली असून शेतामध्ये काम करण्यासाठी एकमेकांना माणसे मिळणे कठीण झाले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









