मदर इंडिया चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
के. आर. शेट्टी लायाज क्रिकेट अकादमी आयोजित 12 वर्षाखालील मदर इंडिया चषक आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना, नीना स्पार्ट्स, लायाज आकदमी, बेळगाव स्पोर्टस क्लब संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. अब्बास, अरजान, वरदराज पाटील, सचिन यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावर आयोजीत या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात युनियन जिमखान्याने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडीबाद 207 धावा केल्या. त्यात हमजाके 102 धावा करुन शतक झळकविले. त्यात विश्रृतने 48, शारुखने 47 तर अबासने 32 धावा केल्या. अर्जुनतर्फे अब्बास, कौस्तुब व अंश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्टस डाव 7 षटकात सर्व गडीबाद 21 धावांत आटोपला. दुसऱ्या सामन्यात नीना स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडीबाद 203 धावला केल्या. त्यात कृष्णाने 73, झियाने 23, अफनानने 10 धावा केल्या. जिमखानातर्फे अरजानने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना जिमखानाने 25 षटकात 7 गडी बाद 88 धावा केल्या. त्यात मिथीलने 32 तर निखीलने 20 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात लायाज क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 265 धावा केल्या. त्यात स्वयम खोतने 103 धावासह शतक झळकवले. त्याला वरदराजने 39, यशने 14 तर खांडूने 13 धावा करून चांगली साथ दिली. उलकल निपाणीतर्फे सिद्धार्थने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना उलकल संघाचा 17 षटकात 90 धावात आटोपला. त्यात ऐश्वर्यने 19 धावा केल्या. लायाजतर्फे वरदराजने 5, खांडूने 2 तर निखीलने एक गडी बाद केला. चौथ्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 4 गडी बाद 192 धावा केल्या. त्यात सचिनने 98, आयुषने 24, आयुष के. ने 22 धावा केल्या. एसकेईतर्फे प्रणितने 2 तर जिवनने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेईचा डाव 18 षटकात 63 धावात आटोपला. त्यात दक्षने 10 धावा केल्या. बीएससीतर्फे कौशिक व्ही. ने 4, अल्तमशने 2, समर्थ पी. व समर्थ जी. यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.









