बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त, धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना अ ने हुबळी क्रिकेट अकादमीचा 5 गड्यांनी, हुबळी स्पोर्ट्स क्लबने अ ने ब चा 261 धावांनी तर हुबळी क्रिकेट अकादमी अ ने बेळगाव स्पोर्ट्चा क्लब अ चा 7 गड्यांनी पराभव केला.
बेळगावच्या केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात हुबळी क्रिकेट अकादमी अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 46.5 षटकात सर्वगडी बाद 171 धावा केल्या. त्यात सौरभ टोपले व समर्थ माने यांनी प्रत्येकी 5 चौकारांसह 41, हार्दीक ओझाने 1 षटकार, 3 चौकारांसह 27, तर सुबेल व अभिषेक यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. जिमखानातर्फे यश हावळण्णाचे, वैभव कुरबागी, प्रतिक खराडे, ऋषिकेश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाने 28 षटकात 4 गडी बाद 172 धावा काढून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात आर्यन इंचलने 1 षटकार 11 चौकारांसह नाबाद 78, वैभव कुरीबागीने 27 तर तनिष्क नाईक, मनोज सुतार व शिवप्रसाद हिरेमठ यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. हुबळीतर्फे निखिल बडीगेरने 2 गडी बाद केले.
केएससीए हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाज करताना 45.3 षटकात सर्व गडी बाद 252 धावा केल्या. त्यात सुजय सातेरीने 3 षटकार, 9 चौकारासह 77, आदर्श माळीने 2 षटकार 11 चौकारांसह 73, केदार उसुलकरने 2 षटकार व 6 चौकारांसह 70, करण बोकडेने 18 धावा केल्या. हुबळीतर्फे मंजुनाथने 51 धावांत 3, पुनीत व राजू यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमी अ ने 37.3 षटकात 3 गडी बाद 254 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात मंजुनाथ एस. ने 1 षटकार, 17 चौकारांसह नाबाद 122, अमोघ काळवेने 1 षटकार 8 चौकारांसह 84 तर पुनीतने 10 धावा केल्या.
केजीजी हुबळी येथे खेळविलेल्या सामन्यात हुबळी र्स्पोर्ट्स अ ने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी बाद 343 धावा केल्या. राहुलसिंग रावतने 6 षटकार 9 चौकारांसह 94, चिराग नायकने 11 चौकारांसह 80, अनमोल पागदने 5 चौकारांसह 62 तर आकाश पत्तारने 5 चौकारांसह 52 तर विठ्ठल हबीबने 15 धावा केल्या. हुबळी ब तर्फे उत्तम गौडा व सतीश नायकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाचा डाव 25 षटकात 82 धावांत आटोपला. त्यात आयुष पाटीलने 4 चौकारांसह 32 तर मदन धारवाडकरने 17 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्स क्लब अ तर्फे रोहन यारीसीमीने 12 धावांत 5 तर डॉम्निक फर्नांडीस, सनदकुमार सिंग यांनी पत्येकी 2 गडी बाद केले.









