प्रतिनिधी/ बेळगाव
आरपीडी पीयू कॉलेजमध्ये जिमखाना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. संतोष चव्हाण उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून देऊन क्रीडा क्षेत्रातून विद्यार्थ्यांना पुढे जाता येते व आपले भविष्य उज्ज्वल करता येते, याविषयी मार्गदर्शन केले.
संस्थेचे व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडाक्षेत्राकडेही लक्ष द्यावे. बौद्धिक ज्ञानासोबतच शारीरिक कवायती महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन लता कित्तूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्हा. चेअरमन ज्ञानेश कलघटगी, प्राचार्य एस. एस. बिजापुरे, प्रा. एम. दोडमनी, अनंत रत्नाप्पगोळ उपस्थित होते. प्रा. शामिन कोएलो व विद्या डुकरे यांनी सूत्रसंचालन केले.