मला कुणीच पाहू शकणार नाही
मार्वलच्या चित्रपटांमध्ये दिसून आलेली लोकप्रिय अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रोच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. अभिनेत्री ग्वेनेथने हॉलिवूडला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कुठल्याही चित्रपटात काम करणार नाही. तसेच स्वत:ची लाइफस्टाइल ब्रँड कंपनी देखील विकणार असल्याचे तिने सांगितले आहे. तिच्या या लाइफस्टाइल ब्रँड कंपनीचे बाजारमूल्य अनेक हजार कोटी रुपये आहे. 2027 मध्ये 55 व्या जन्मदिनी हॉलिवूडचा निरोप घेईन आणि मग जगाच्या नजरांपासून गायब होणार असल्याचे तिचे सांगणे आहे. ऑस्कर विजेती अभिनेत्रीने स्वत:ची कंपनी विकणार असल्याचे सांगितले असले तरीही याकरता आणखी काही वर्षे घेणार असल्याचे म्हटले आहे. 2027 मध्ये 55 व्या जन्मदिनापर्यंत स्वत:च्या सर्वप्रकारच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊ इच्छित असल्याचे तिने म्हटले आहे. खरोखरच जगाच्या नजरांपासून दूर जाण्याचा मी निर्णय घेतला आहे. त्यानंतर मला कुणीच सार्वजनिक आयुष्यात पाहू शकणार नाही. सेलेब्रिटी स्टेटसमुळे मला कुठलाच आनंद मिळत नाही. उलट खरा आनंद शांतता, सहकार्य करणे, नव्या कल्पना सुचविणे, रणनीति तयार करण्यात मिळतो असे तिचे सांगणे आहे. ग्वेनेथच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा झटका बसला आहे.









