कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकरला मदत केल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने गुटखा किंग जगदीश एम जोशी (67) याला 10 वर्षाची शिक्षा झाली आहे. गोवा नावाच्या गुटखा ब्रँडचा मालक असलेला जोशीसह इतर दोघांना दहा वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 15 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तो आणि त्याचा मेहुणा अब्दुल अंतुले यांनी पाकिस्तानातील कराची येथे गुटख्याचा कारखाना उभारला होता.
सीबीआय न्यायालयाने जगदिश जोशी, फारुख मन्सुरी (५५) आणि जमिरुद्दीन अन्सारी (५४) यांना दाऊद गँगच्या संघटित गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंध असल्याचे सांगून दोषी ठरवले. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याकडून आरोपींवरिल गुन्हा सिद्ध करण्यासाठी ४२ साक्षीदारांना तपासण्यात आले.
सीबीआयने माणिकचंद या गुटख्याच्या ब्रँडचा मालक रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्यासह नऊ आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. दाऊद, अंतुले आणि सलीम शेख यांना या प्रकरणात वॉन्टेड आरोपी म्हणून दाखवले होते. खटल्यादरम्यान धारिवाल यांचा मृत्यू झाल्याने त्याच्यावरील खटला रद्द करण्यात आला. तर दुसरा आरोपी राजेश पंचारिया याला सोडून देण्यात आले. फिर्यादीच्या आरोपानुसार, जोशी आणि त्याचा जुना साथीदार रसिकलाल धारिवाल यांच्यात आर्थिक वाद होता. दोघांनी हा वाद सोडवण्यासाठी दाऊदची मदत घेतली होती. वाद मिटवण्याच्या बदल्यात, दाऊदने 2002 मध्ये कराचीमध्ये गुटखा-उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी दोघांची मदत घेतली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








