प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव सकल मराठा समाजातर्फे येत्या 15 मे रोजी गुरुवंदना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी पत्रकांचे अनावरण मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ. समीर कुटे, डॉ. अनिल पोटे, रमाकांत कोंडुस्कर, मिलिंद भातकांडे, विजय पाटील, अनंत लाड, डॉ. मिलिंद हलगेकर, जयवंत खन्नूकर, विशाल कंग्राळकर व सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकाचे पूजन करून शहरातील काही ऑटोरिक्षांवर पत्रके लावून प्रचारकार्याला सुरुवात करण्यात आली.
मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी कार्यक्रमाचा उद्देश व स्वरुप स्पष्ट केले. यावेळी बोलताना जाधव म्हणाले, गुरुवंदना हा कार्यक्रम 15 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मराठा समाजाचे मंजुनाथ स्वामी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम आदर्श विद्या मंदिरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात मंजुनाथ स्वामीजींच्या शोभायात्रेतून होणार आहे. ही शोभायात्रा सकाळी 9 वाजता कपिलेश्वर मंदिरापासून सुरू होणार आहे. त्यानंतर स्वामीजींचा सत्कार होईल, असे किरण जाधव यांनी सांगितले.









