प्रतिनिधी /बेळगाव
योगगंगा योगकक्षतर्फे सराफ कॉलनी येथील अभयोद्यानात गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुक्ता पाटील यांनी ईशस्तवन सादर केले.
यावेळी आरती कानगो म्हणाल्या, आपण गुरुरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नियमित योग केला पाहिजे. किरण मन्नोळकर म्हणाले, जीवन जगताना आपण वेळ, योग्य शब्द व संधीचा सदुपयोग या त्रिसुत्रीचा वापर केला पाहिजे. वैशाली भारती यांनी स्वरचित ‘गुरुवर’ ही कविता सादर केली. वनिता जोशी यांनी योगनृत्य सादर केले. शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शिवानी, संगीता जोशी, जान्हवी यांनी गीतगायन केले. स्वागतगीत सुनंदा बडवाण्णाचे यांनी सादर केले. अतिथी परिचय अजित हालसोडे यांनी केला. योगगुरु अमरेंद्र कानगो व आरती कानगो यांचा सत्कार पार्वतीबाई भातकांडे यांनी केला.
यावेळी पतंजली योग समितीचे अमरेंद्र कानगो, आरती कानगो, किरण मन्नोळकर, पुरुषोत्तम पटेल, मोहन बागेवाडी, जोतिबा भादवणकर, संगीता कोनापूरे, चंद्रकांत खंडागळे, मगनभाई पटेल, बाबुभाई पटेल, विमलाबेन पटेल, योगगंगा योगकक्षचे योगसाधक उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपा पाटील यांनी केले. शाम जोशी यांनी आभार मानले.









