दोडामार्ग – वार्ताहर
फरा प्रतिष्ठान आदर्श गाव केर आणि स्नेहबंध दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दशावतारातील गुरुशिष्य परंपरा वृद्धिंगत करणारी गुरुपौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोमवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 9.30 वा. कुडाळ येथे महालक्ष्मी हॉल नं 2 गुलमोहर हॉटेल या ठिकाणी संपन्न होणार आहे. या गुरुपौर्णिमेस ऋषितुल्य, गुरुतुल्य दशावतार जेष्ठ कलावंत जयसिंग राणे, प्रभाकर पार्सेकर, जीजी चोडणेकर, भाई उर्फ भास्कर सामंत, सुरेश गावडे, आजोबा परुळेकर, एकनाथ गोसावी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
Previous ArticleKolhapur : ऑलम्पिक सुवर्णकन्या दीक्षाची कोडोलीत भव्य मिरवणूक; गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Next Article न्हावेलीत एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम !









