प्रतिनिधी /बेळगाव
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सेंट्रल हायस्कूल, मराठा मंडळ व जिजामाता हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला. श्रीफळ व तुळशी वृंदावन देऊन शिक्षकांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वजीत हसबे, मराठा मंडळचे मुख्याध्यापक एल. एन. शिंदे, जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. बी. देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रफुल्ल शिरवलकर यांनी केले. यावेळी विकास मांडेकर, विनोद हंगीरकर, गजानन बांदेकर, गिरीष धामणेकर, सुरेंद्र मुरकुटे, संजय हिशोबकर, आदिनाथ सालगुडे, मोहन पाटील, लक्ष्मीकांत हावळ यासह इतर उपस्थित होते.









