अजय पालसिंग व शशांक वर्मा यांचाही गौरव
बेळगाव : मॉस्को येथे ब्रीक्स बुद्धिबळ सुपर फायनल्स स्पर्धेसाठी बेळगावच्या गुरुप्रसाद मोतीचंद पावसकर, अजय पालसिंग दिल्ली व कर्णधार शशांक वर्मा यांनी स्पर्धेत सहभाग होऊन यश संपादन केले आहे. मॉस्को येथे झालेल्या एससीओ ब्रीक्स सुपर फायनल्स बुद्धिबळ स्पर्धेत पाच देशातील जवळपास हजारोहून अधिक स्पर्धेकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये ब्राझील, रशिया, द. आफ्रिका, चीन व भारत या देशांचा समावेश होता. बेळगाव (कर्नाटक) गुरुप्रसाद मोतीचंद पावसकर यांनी 9 सामन्यामध्ये 3 सामन्यात विजय मिळविला. तर दिल्लीच्या अजय पालसिंग याने 9 सामन्यात 2 सामन्यातून विजय मिळविला. या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढविल्याबद्दल भारतीय बुद्धिबळ संघातील खेळाडूंना प्रमाणपत्र, चषक व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कामगिरीबद्दल महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार संजय पाटील व अनिल बेनके यांनी गुरुप्रसादच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.









