कुडाळ –
प.पू.राऊळ महाराज गुरुपौर्णिमा उत्सव 10 जुलै रोजी पिंगुळी येथील प.पू.राऊळ महाराज समाधी मंदिर व प.पू विनायक (अण्णा) महाराज राऊळ समाधी मंदिरात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सोमवार ते बुधवार पर्यंत श्रीपाद श्री वल्लभ गुरुचरित्र पारायण झाले. 10 जुलै रोजी पहाटे 5.30 वाजता नित्य काकड आरती, सकाळी 7 वाजता प.पू.राऊळ महाराज समाधीस्थानी पूजन, सामूहिक अभिषेक व सामूहिक गाऱ्हाणे,9 वाजता दत्त मंदिर येथे अभिषेक पूजा, सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत नामस्मरण, 11 वाजता प.पू. विनायक (अण्णा ) राऊळ महाराज यांच्या समाधीस्थानी अभिषेक व पादुका पूजन, दुपारी 12 वाजता महाराजांची महाआरती , दुपारी 1ते रात्री 11 वाजेपर्यंत अखंड महाप्रसाद, दुपारी 1 वाजता श्री देव गाववडेश्वर भजन मंडळ (आसोली – वडखोल ) बुवा संकेत कुडव यांचे भजन, 3 वाजता वारकरी भजन ,सायंकाळी 5.30 वाजता श्री रामकृष्ण हरी सेवा संघ (तेंडोली) यांचे भजन, 7 वाजता नित्य सांजआरती ,रात्री 8 वाजता प.पू.राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये पालखी मिरवणूक सोहळा,10 वाजता प.पू. राऊळ महाराज भजन मंडळ (पिंगुळी ) यांचे भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.भाविकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सद्गुरु राऊळ महाराज संस्थान (पिंगुळी ) चे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ तसेच विश्वस्त मंडळाने केले आहे.









