वृत्तसंस्था/ मोहाली
जखमी राज अंगद बावाच्या जागी पंजाब किंग्सने गुरनूर सिंग ब्रारला करारबद्ध केले आहे. आयपीएल मीडिया अॅडव्हायजरीने बुधवारी याबाबत सांगितले.
या 22 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला पंजाब किंग्सने 20 लाख रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. गेल्या मोसमात राज अंगद बावा पंजाबकडून दोन सामने खेळला होता. यावेळी त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली असल्याने तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. गुरनूरने डिसेंबर 2022 मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून त्याने आतापर्यंत 5 सामन्यात भाग घेतला आहे. त्यात त्याने 120.22 च्या स्ट्राईकरेटने 107 धावा जमविल्या आणि गोलंदाजीत 3.80 च्या इकॉनॉमी रेटने 7 बळी मिळविले आहेत.









