वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या सुरु असलेल्या 2023 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे इंग्लंड विरूद्ध झालेल्या सामन्यात अफगाणचा फलंदाज रहमनुल्ला गुरबाजकडून शिस्तपालन नियमाचा भंग झाला. दरम्यान गुरबाजला आयसीसीच्या शिस्तपालन समितीने सक्त ताकीद देऊन या प्रकरणावर पडदा टाकला.
या सामन्यामध्ये अफगाणने इंग्लंडचा 69 धावांनी पराभव करुन अनपेक्षीत धक्का दिला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा धक्का देणारा सामना ठरला. या सामन्यात खेळताना गुरबाजने क्रिकेट साहित्य आणि पोषाखावर टीका केली. गेल्या 2 वर्षांच्या कालावधीतील गुरबाजकडून हा पहिला गुन्हा असल्याने आयसीसीने त्याला सक्त ताकीद देऊन सोडले. गुरबाजने आयसीसीच्या शिस्तपालन समितीसमोर आपला गुन्हा कबूल केला.









