कट्टा / वार्ताहर
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा 2025 महाश्रमदान एक दिवस एक तास एक साथ हा उपक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने या मोहिमेची संकल्पना राबविण्याच्या अंतर्गत स्वच्छता उत्सव 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता सेवा पंधरवडा सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा करण्यात येते आहे. याच पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील वरची गुरामवाडी ग्रामपंचायत कार्यालय कट्टा यांच्यावतीने वराडकर हायस्कूल कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन स्वच्छता मोहीम प्रभात फेरी काढण्यात आली व बाजारपेठेत काही ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रभात फेरी दरम्यान सजग जागरुक नागरिक बना प्लास्टिक वापरास नको म्हणा, स्वच्छ भारत स्वस्थ भारत, स्वच्छता शिका आरोग्याला जिंका, स्वच्छता पाळा रोगराई टाळा, सांडपाण्याला आळा रोगराई टाळा अशा आशयाचे फलक घेऊन स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. यावेळी सरपंच शेखर पेणकर, ग्रामपंचायत अधिकारी एम. एस. पिळणकर, ग्रा.प. सदस्य वंदेश ढोलम, मयुरी कुबल, वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कट्टाचे भुजबळ मॅडम, मासी सर, अंगणवाडी सेविका नीता वाईरकर, साक्षी शंकरदास ग्रामपंचायत कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.









