सांगली: ‘बैल गेला आणि झोपा केला” अशी गत महापालिका प्रशासनाची झाली आहे. ऐन पावसाळ्यात खराब रस्त्यामुळे नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागल्या. नगरसेवकांनी महासभेसह स्थायी समितीमध्ये प्रशासनाच्या कारभाराची पिसे काढल्यानंतर महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी व अविकसीत भागात मुरुम टाकण्यासाठी प्रशासनाने ४० लाखांची निवीदा काढली आहे. आज होणाऱ्या स्थायी समितीमध्ये यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसा प्रस्ताव समितीमध्ये दरमान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती निरंजन आवटी यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी साडे बारा वाजता पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.पावसाळी मुरुमासह जलनिस्सारण विभागासाठी आवश्यक साहित्य खरेदी, सांगली येथील भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक २ मधील अंकली रोड पंपींग स्टेशन करीता विद्युत पुरवठा घेणे आदी विषय अजेंड्यावर आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमधील जवळपास ६० ते ७० भाग गुंठेवारीचा आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागतात. रस्त्यांवर दलदल निर्माण होते. त्यामुळे नागरिककांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. यावेळीही अशीच स्थिती उदभवली होती. आधीचं रस्ते खराब त्यात ड्रेनेज व गॅस पाईपलाईनसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे अनेक भागातील रस्त्यांवर दलदल निर्माण झाली होती. आप्पासाहेब पाटील नगरमधील नागरिकांनी तर आयुक्तांना त्यांच्या शासकिय निवासस्थानामध्ये घुसून. जाब विचारला होता. महासभा, स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत गुंठेवारी भागातील रस्त्यांचे मुरूमीकरण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रभाग समिती १ ते ४ साठी ४० लाखांची निवीदा काढण्यात आली होती. या खर्चास मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








