ऑनलाईन टीम/तरुण भारत
संपकरी एसटी (ST) कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली होती. त्यांनतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर इतर 109 आंदोलनकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ११ रोजी पुन्हा त्याचा कालावधी संपल्याने पोलिसांना सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर केले त्यावेळी कोर्टाने सदावर्तेंना आणखी दोन दिवसांची म्हणजेच 13 एप्रिल 2022 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पोलीस कोठडीचा कालावधी संपला असता सदावर्ते यांना न्यायालयात उभं केले. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली आहे. तसेच १७ एप्रिलपर्यंत सदावर्ते यांचा ताबा घेण्याची सातारा पोलिसांना परवानगीही देण्यात आली आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयाने सदावर्ते त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच न्यायालयाने कोठडीत असताना १७ एप्रिलपर्यंत सदावर्ते यांचा ताबा घेण्याची सातारा पोलिसांना परवानगीही देण्यात आली आहे.








