वार्ताहर/गुंजी
घटस्थापनेपासून सुरू झालेल्या गुंजी येथील दुर्गामाता दौडला गुंजीसह पंचक्रोशीतील युवक, युवतींसह नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून दिवसेंदिवस गुंजीसह विविध गावात दौडीच्या स्वागतासह सहभागी होणाऱ्या धारकऱ्यांची संख्या वाढत असल्याने शेकडोंच्या संख्येने अमाप उत्साहात दौड साजरी होत आहे. सुरुवातीस गुंजी माऊली मंदिरापासून येथील ज्येष्ठ पंच राजाराम देसाई यांच्या हस्ते ध्वज देऊन दौडीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी राजाराम देसाई, रावजी बिरजे, ग्रा. पं. अध्यक्षा स्वाती गुरव, मल्लसर्ज बिरजे यांनी मार्गदर्शन केले. राजहंसगड ते गुंजीपर्यंतचा रात्रभर प्रवास करून ध्वज आणलेल्या धारकऱ्यांचेही कौतुक करण्यात आले. सध्या दर दिवशी रवळनाथ मंदिरपासून सकाळी दौडला प्रारंभ होत आहे. दररोज वेगवेगळ्dया मार्गाने दौड फिरत असून आजूबाजूच्या खेड्यामध्येही दौडीचे भव्य स्वागत केले जात आहे. दौडसाठी पंकज कुट्रे, रवळू पाटील, व्यंको घाडी, प्रसाद घाडी, अजय नाळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.









