‘गगन नारंग फाऊंडेशन’ व ‘वॉल्थर’चे सहकार्य, खेळाडूंना रायफलची भेट
► पुणे / प्रतिनिधी
ऑलिंपिक पदक विजेते तयार करण्याच्या ध्येयाअंतर्गत ऑलिंपिक कांस्यपदक विजेते नेमबाज पद्मश्री गगन नारंग यांच्या गगन नारंग स्पोर्टस् प्रमोशन फाऊंडेशन (जीएनएसपीएफ) आणि बंदूक उत्पादन क्षेत्रात जागतिक पातळीवर नावाजलेल्या ‘वॉल्थर’कडून आगामी पॅरिस ऑलिंपिकमध्ये कोटा प्राप्त भारतीय नेमबाजांना पाठबळ जाहीर करण्यात आले आहे.
‘वॉल्थर’ने जीएनएसपीएफ सोबत पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात सहभागी होणारे ऊद्रांक्ष पाटील आणि मेहुली घोष तसेच पॅरालिंपिक कोटामध्ये समावेश होण्याची दाट शक्मयता असलेले स्वरूप उन्हाळकर यांना अत्याधुनिक अर्थात हाय-एंड रायफल भेट स्वरूपात देण्यात आली. एका रायफलीची किंमत ही 3.75 लाख ऊपये इतकी आहे.
ऑलिंपिक विजेते नेमबाज तसेच गन फॉर ग्लोरी नेमबाजी अकादमीचे सह-संस्थापक आणि भारतीय ऑल्sिंपिक संघटनेचे (आयओए) उपाध्यक्ष पद्मश्री गगन नारंग यांच्यासह जर्मनी येथील कार्ल वॉल्थर जीएमबीएच या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नहार्ड नोबेल, कंपनीच्या वितरण विभागाचे संचालक द्रागर क्लाऊस, हाय रायफल प्रशिक्षक, जागतिक दर्जाचे खेळाडू व पाच वेळा ऑलिंपिक पदक विजेते पीटर सीडी, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) चे संयुक्त सचिव आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (आयएसएसएफ) चे पंच समिती सदस्य पवन सिंह आदी या वेळी उपस्थित होते.
‘भारतीय नेमबाजांनी जास्तीत जास्त ऑलिंपिक पदके जिंकावीत, हे आमचे स्वप्न वॉल्थरसारख्या कंपनीनेदेखील पहावे आणि अशा पद्धतीने आम्हाला सहकार्य करावे, हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि समाधानाचा क्षण आहे. कित्येक स्पर्धांच्या प्रत्येक संभाव्य स्तरावर पदक जिंकण्याकरीता मी वैयक्तिकरित्या वॉल्थरच्या रायफल्स वापरल्या आहेत. ऑलिंपिकमध्ये इतर भारतीय नेमबाजांना पदक जिंकून देण्याच्या आमच्या प्रयत्नात ही दिग्गज कंपनी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे, हे खरोखरच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे नारंग यांनी सांगितले.
बर्नहार्ड नोबेल म्हणाले, भारतीय नेमबाजांसोबतचे असलेले आमचे संबंध हे मैत्रीपूर्ण आणि जुने आहेत. भारतामध्ये हजारो प्रतिभावान नेमबाज असून वॉल्थर ही जगातील आघाडीची बंदूक निर्माता कंपनी आहे. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे अनेक विजेते नेमबाज घडवू शकू.
जागतिक स्पर्धेचा विजेता आणि गन फॉर ग्लोरीचे नेमबाज ऊदांक्ष पाटील म्हणाला, स्पर्धेसाठी तयारी करत असताना या टप्प्यात ही मदत आमच्यासाठी मोलाची आहे. नेमबाजीत अचूकता ही खूप महत्त्वाची असते आणि प्रत्येक गन बनविताना वॉल्थर ही अचूकता जपण्याची काळजी घेते. यामुळे पॅरिस ऑलिंपिकपूर्वी चांगली कामगिरी करण्यास मदत होईल.
मेहुली घोष यावेळी बोलताना म्हणाली, मी जी पहिली रायफल पाहिली होती ती वॉल्थरची होती. तेव्हापासून मी स्पर्धेत कमावलेला प्रत्येक गुण आणि जिंकलेले प्रत्येक पदक हे याच कंपनीची रायफल वापरून जिंकले आहे. आज ही अत्याधुनिक रायफल मिळाल्याचा मला फार आनंद आहे.
पॅरिस ऑलिंपिकसाठी पॅरालिंपिक कोटामध्ये सहभागी होण्याच्या प्रयत्नात असलेला स्वरूप उन्हाळकर म्हणाला, गन फॉर ग्लोरी, गगन नारंग सर आणि पवन सिंग हे पॅरा स्पोर्टसाठी खूप महत्त्वाचे काम करत आहेत. त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आणि वॉल्थरचा आभारी आहे.









