नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
विश्व अॅथलेटिक्स आंतरखंडीय टूरवरील अमेरिकेत झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू गुलवीर सिंगने पुरुषांच्या 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला. त्याने या क्रीडा प्रकारात 27 मिनिटे, 22 शेकंदाचा अवधी घेतला.
गुलवीर सिंग हा भारताचा दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीतील आघाडीचा धावपटू म्हणून ओळखला जातो. गुलवीर सिंगने यापूर्वीच्या आशिया क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळविले होते. गेल्या नोव्हेंबरमध्ये जपानमध्ये झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगने 27 मिनिटे, 14.88 सेकंदाचा अवधी घेत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. हा राष्ट्रीय विक्रम त्याने अमेरिकन अॅथलेटिक्स स्पर्धेत मोडीत काढला. 26 वर्षीय गुलवीर सिंगने 2023 च्या बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत या क्रीडा प्रकारात दोनवेळा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. अमेरिकेत झालेल्या या स्पर्धेत गुलवीर सिंगला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.









