वार्ताहर / पणजी
तिसवाडी तालुक्यातील डोंगरी गावांत ऐतिहासिक परंपरा असलेल्या इंत्रुज उत्सवाची बुधवार दि. 15 रोजी गुलालोत्सवाने सांगता झाली.
राज्यातील शिमगोत्सवापूर्वी ढोल-ताशे वाद्यावर प्रथम बडी पडते ती डोंगरी येथील श्री जगदंबा षष्ठी शांतादुर्गा देवीच्या इंत्रुजोत्सवात. शुक्रवार दि. 10 रोजी फट्या सुवारी विधी वादनाने झाली. शनिवार दि. 11 ते मंगळवार दि. 14 पर्यंत सकाळपासून श्री शांतादुर्गा मंदिरात धार्मिक विधी, पारंपरिक नृत्य, गायन, रोमटामेळ, वादन केलेचे विविध पैलू, लालखी मिरवणूक, देवीच्या छत्रीचे आगमन, डोंगरी, मंडूर, आजोशी, नेवरा गावात सुवारी निघाली. घरोघरी देवीचे स्वागत सुहासिनींनी ओटी भरून केले. डोंगरी थोरले भाट, धाकटे भाट येथील देवाच्या पेडावर देवतेच्या छत्र्यांवर गुलाल उधळण्यासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने पहाटेपर्यंत रोमटामेळाच्या वादनात सहभागी झाले होते.
बुधवार दि. 15 रोजी गुलालोत्सवाने इंत्रुज उत्सवाची सांगता झाली. गुलाल उधळून रंगपंचमी साजरी करण्याचा प्रथम मान श्dरी जगदंबा षष्ठी शांतादुर्गा देवीच्या पायांकडुल इंत्रुज उत्सवामुळे डोंगरीवासियांना प्राप्त होत असल्याने खऱ्या अर्थाने राज्यात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला, असे म्हणावे लागेल.









