Gulabrao Patil On Milind Narvekar : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे त्य़ांच्य़ा वक्तव्यामुळे आणि गौप्यस्फोटमुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय़ वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत आहेत, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. शिवसेनेतील बंडानंतर मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपतीच्या दर्शनासाठी नार्वेकर यांच्या निवासस्थानी गेले होते. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत असल्याचं वक्तव्य केल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे.
बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा
मराठी बिग बॉस होस्ट करणारे महेश मांजरेकर यांना नुकताच एक प्रश्न विचारण्यात आला होता की, राजकारणातील कोणकोणते चेहरे बिग बॉसमध्ये तुम्हाला पाहायला आवडतील. त्यावर महेश मांजरेकर यांनी गुलाबराव पाटील यांचं नाव घेतलं होतं. यानंतर गुलाबराव पाटलांनी बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Previous Articleमला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान : आदित्य ठाकरे
Next Article मडगावातील 11 क्षयरोग रुग्ण दत्तक









