वृत्तसंस्था/ हॅम्बर्ग, जर्मनी
अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाविऊद्ध सलग दुसऱ्या क्वार्टरफायनल लढतीमध्ये पराभव पत्करावा लागल्याने विश्वविजेता डी. गुकेश फ्रीस्टाइल ग्रँडस्लॅम बुद्धिबळातून बाहेर पडला आहे. पहिला गेम पांढऱ्या सेंगाट्यांसह खेळताना गमावल्यानंतर दुसऱ्या लढतीत गुकेश अमेरिकन ग्रँडमास्टरविऊद्ध फार काळ टिकू शकला नाही. या लढतीत विजय मिळविणे गुकेशसाठी अत्यंत आवशयक होते. पण काऊआनाने केवळ 18 चालींमध्ये हा सामना संपविला.
गुकेश आता अंतिम चार म्हणजे पाचव्या ते आठव्या स्थानांसाठी लढेल. हिकारू नाकारा आणि जाकोव्हीर सिंदारोव्ह यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीत हरणाऱ्या खेळाडूशी त्याचा सामना होईल. फ्रीस्टाइल बुद्धिबळाचे स्वरूप वेगळ्या स्वरुपाचे आहे. गुकेशने सुऊवातीपासूनच एक प्यादे गमावले आणि त्यामुळे कारुआनाला खेळावर नियंत्रण मिळविण्यास मदत झाली.
काऊआना हा असा खेळाडू आहे जो काही काळापासून हा प्रकार खेळत आला आहे आणि या इटालियन-अमेरिकन खेळाडूला पारंपरिक बुद्धिबळाच्या स्थितीत पोहोचण्यासाठी 15 चाली लागल्या. गुकेशने हाती फारसे काही राहिलेले नाही याची जाणीव झाल्यानंतर काऊआनाला आव्हान न देण्याचा निर्णय घेतला आणि हार मान्य करून हस्तांदोलन केले.









