वृत्तसंस्था/ विज्क अॅन झी (नेदरलँड्स)
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जागतिक विजेता डी. गुकेश भाग्यवान राहून त्याने कठीण स्थितीतून उसळी घेऊन हॉलंडच्या अनीश गिरीला हरवले. शुक्रवारी खेलरत्न पुरस्कार स्वीकारून अॅमस्टरडॅमला उ•ाण केलेला गुकेश पहिल्या फेरीच्या काही तास आधी येथे पोहोचला. कदाचित याचा परिणाम या तऊण भारतीय खेळाडूवर झालेला असू शकतो. पण गरजेच्या क्षणी तो टॉप गियरमध्ये आला.
गुकेश या सामन्यात हरणार असेच वाटत होते. पण त्याने अशा काही चाली केल्या की, गिरी अडचणीत आला आणि डच खेळाडूला शेवटी विजयाने हुलकावणी दिली. तीन निर्णायक सामने या पहिल्या फेरीत पाहायला मिळाले. त्यात पांढऱ्या सोंगाट्यानिशी खेळताना या अनुकूलतेचा पुरेपूर फायदा पी. हरिकृष्णाने घेतला आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अर्जुन एरिगेसीचा बचाव भेदून त्याच्यावर मात केली.
दुसरीकडे, लिओन ल्यूक मेंडोन्साने जवळजवळ जिंकलेली लढत हाताबाहेर जाऊ दिली. कारण त्याने अनेक चुका केल्या, ज्यामुळे जर्मन व्हिन्सेंट कीमरला विजयी सुऊवात करता आली. आर. प्रज्ञानंदने नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हविऊद्ध कडक प्रतिकार केला आणि अखेर बरोबरी साधली. पहिल्या फेरीतील इतर सामनेही बरोबरीत संपले. गतविजेत्या चीनच्या वेई यीने अव्वल मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनासोबत बरोबरी साधली, तर हॉलंडच्या मॅक्स वॉर्मरडॅमला सर्बियाच्या अॅलेक्सी सरनासोबत गुण विभागून घ्यावे लागले. आणखी एक डच खेळाडू जॉर्डन व्हॅन फॉरेस्टने स्लोव्हेनियाच्या व्लादिमीर फेडोसेव्हसोबत बरोबरी साधली.
चॅलेंजर्स विभागात आर. वैशालीने जगातील सर्वांत तऊण आंतरराष्ट्रीय मास्टर अर्जेंटिनाच्या ओरो फॉस्टिनोविऊद्ध विजय मिळवून सुऊवात केली, परंतु दिव्या देशमुखला उच्च मानांकित उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबोएव्हकडून पराभव पत्करावा लागला.
गुकेश-गिरी सामन्यात भारतीय खेळाडूने कॅटलान ओपनिंगने सुरुवात केली आणि मधल्या खेळात गुंतागुंत निर्माण केली. गिरीला काही योग्य चाली शोधाव्या लागल्या आणि त्याने वर्चस्वही मिळविले होते. गुकेशकडे खरे तर 14 चाली करण्यासाठी एका मिनिटापेक्षा कमी वेळ शिल्लक होता. 33 चालींनंतर गुकेश जवळजवळ हरल्यात जमा अशी स्थिती होती, पण गिरीने नंतरच्या दोन चालींत केलेल्या चुका त्याच्या पथ्यावर पडल्या आणि गुकेश 42 चालींमध्ये जिंकला.









