वृत्तसंस्था/ समरकंद, उझबेकिस्तान
फिडे ग्रँड स्वीसमध्ये जागतिक विजेता डी. गुकेशला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागून सहाव्या फेरीत ग्रीसच्या निकोलस थियोडोरोने त्याला पराभूत केले. मागील फेरीत त्याला अमेरिकेचा सर्वांत तऊण ग्रँडमास्टर अभिमन्यू मिश्राविऊद्ध पराभव पत्करावा लागला होता. गुकेशला अनिर्णित स्थितीतून आणखी एक धक्का सहन करावा लागला. कारण त्याने जास्त दाब टाकल्याने गुंतागुंत निर्माण झाली आणि त्याला त्याचा फटका सहन करावा लागला.
अर्जुन एरिगेसी काळ्या सोंगाट्यासह खेळताना इराणच्या एकट्याने आघाडीवर असलेल्या परहम मगसुदलूला रोखण्यात फारशी अडचण आली नाही. जरी इराणी खेळाडूने त्याच्या सहा सामन्यांमधून पाच गुणांसह एकट्याने आघाडी घेतली असली, तरी एरिगेसी 4.5 गुणांसह या आघाडीच्या खेळाडूपासून फक्त अर्धा गुण मागे आहे. या अत्यंत महत्त्वाच्या स्विस स्पर्धेत अर्ध्या टप्प्यानंतर अभिमन्यू मिश्रा, जर्मनीचा मॅथियास ब्लूबॉम आणि निहाल सरिन यांनी एरिगेसीसोबत संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले आहे.
या दिवशी अव्वल मानांकित ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद अझरबैजानच्या रौफ मामेदोव्हचा भक्कम बचाव भेदण्यात अपयशी ठरला, तर त्याची बहीण आर. वैशालीने उल्विया फतालियाएव्हाला मागे टाकून महिला विभागात कॅटेरिना लॅग्नोसह संयुक्त आघाडी कायम ठेवली. फिडे प्रतिनिधी म्हणून खेळणाऱ्या कॅटेरिना लॅग्नोला दिनारा वॅग्नरला हरवताना कठोर परिश्रम करावे लागले. या सामन्यातील शेवटच्या टप्प्यातील खेळ हा बरोबरीच्या दिशेने झुकला होता. वैशालीने काळ्या सोंगाट्यांसह खेळताना पूर्ण नियंत्रण ठेवले. तिने दोन्ही बाजूंनी आक्रमक सुऊवात केली.
गुकेशला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे होते आणि ते महागात पडले. विश्वविजेत्याला शेवटच्या टप्प्यातील खेळ बरोबरीत आणता आला असता, परंतु एक चूक त्याला महागात पडली. आता पन्नास टक्के गुणांसह गुकेशला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उर्वरित पाचपैकी किमान चार सामने जिंकावे लागतील. दुसरीकडे, प्रज्ञानंदने सर्वोत्तम प्रयत्न केले, पण एकदाही मामेदोव्ह डगमगला नाही तर सरिनला त्याचा पोलिश प्रतिस्पर्धी स्झिमोन गुमुलार्झच्या मोठ्या रणनीतिक दुर्लक्षाचा फायदा झाला आणि त्याने गुणतालिकेत वर झेप घेतली.
दोन्ही विभागांमध्ये गुऊवारी पहिल्या दोन स्थानांसाठी आणि 8 लाख 55 हजार अमेरिकन डॉलर्सच्या बक्षिसांसाठी लढाई पुन्हा सुरू होईल. प्रत्येक विभागातील अव्वल दोन खेळाडू 2026 च्या कँडिडेट्स स्पर्धेत प्रवेश करतील. अन्य निकालांत मॅथियास ब्लूबॉम व अभिमन्यू मिश्रा, अमीन तबताबाई व अलिरेझा फिरोजा, मॅक्सिम रॉडश्टीन व नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह, नोदिरबेक याकुबोएव्ह व व्ही. प्रणव हे सामने बरोबरीत संपले. आंतोन डेमचेन्को विदित गुजराथीकडून पराभूत झाला, तर अभिमन्यू पुराणिकने रिचर्ड रॅपपोर्टशी, पी. हरिकृष्णने एडिज गुरेलशी, आदित्य मित्तलने बोरिस गेलफँडशी, आर्यन चोप्राने व्लादिस्लाव्ह आर्टेमीव्हशी आणि दिव्या देशमुखने गॅब्रिएल सरगिसियनशी बरोबरी साधली.









