वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर (नॉर्वे)
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक विजेता डी. गुकेशला दुसरा पराभव स्वीकारावा लागला असल्याने तो अडचणीत आला असून दुसऱ्या फेरीत त्याच्या बचावफळीला भेदत भारतीय खेळाडू अर्जुन एरिगेसी संयुक्तपणे आघाडी मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. दुसरीकडे, हिकारू नाकामुराने आर्मागेडन टाय-ब्रेकमध्ये मॅग्नस कार्लसनला हरवले.
सहा खेळाडूंच्या दुहेरी राउंड-रॉबिन ‘खुल्या’ प्रकारात पारडे भारी मानला जाणारा गुकेश पहिल्या दोन फेऱ्या गमावल्यानंतर गुणतालिकेत तळाशी गेला आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला भारतीय खेळाडू एरिगेसी अमेरिकन ग्रँडमास्टर नाकामुरासह व 4.5 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आला आहे. दोन्ही भारतीयांच्या तणावपूर्ण संघर्षात पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळताना एरिगेसीने सुऊवातीला आघाडी घेतली, परंतु गुकेशच्या लवचिक बचावाने शेवटच्या टप्प्यात काहीशी बरोबरीची स्थिती निर्माण केली. परंतु एरिगेईसीने अखेर चार तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या लढतीत विजय मिळवला.
या वर्षाच्या सुऊवातीला टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत गुकेश जेतेपद जिंकण्याच्या तयारीत असतानाच त्याच्याकडून एक गेम हिसकावून घेणाऱ्या एरिगेईसीने पुन्हा एकदा या किशोरवयीन विश्वविजेत्याला मोठा धक्का दिला. गुऊवारी 19 वर्षे पूर्ण करणार असलेल्या गुकेशला त्याने 62 चालींमध्ये हरवले. या 21 वर्षीय खेळाडूने 2801 चे सर्वोच्च रेटिंग मिळवून रेटिंगच्या आघाडीवर इतिहासातील 15 व्या खेळाडूचे स्थान मिळविलेले आहे. डिसेंबरमध्ये 2800 चा उंबरठा ओलांडणारा विश्वनाथन आनंदनंतरचा तो दुसरा भारतीय खेळाडू बनला होता. सोमवारी आर्मागेडनमध्ये चिनी ग्रँडमास्टर वेई यीवर मात करून त्याने 1.5 गुण मिळवले होते. गुकेशविऊद्ध क्लासिकल चेसमध्ये 6-0 अशी आश्चर्यजनक कामगिरी एरिगेसीने केलेली आहे. गुकेशने वेळेच्या दबावाखाली सापडण्याइतपत सुऊवातीच्या चालींमध्ये इतका वेळ का घेतला असा प्रश्न एरिगेसीला पडला.
अर्जुन एरिगेसी तिसऱ्या फेरीत अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो काऊआनाशी खेळेल, तर गुकेश रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या नाकामुराविऊद्ध खेळताना पुनरागमनाची आशा बाळगेल. दुसरीकडे, जागतिक क्रमांक 1 कार्लसन आणि क्रमांक 2 नाकामुरा यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना दोन्ही बाजूंनी अचूक चालींच्या मालिकेनंतर बरोबरीत सुटला. त्यानंतर आर्मागेडनमध्ये कार्लसनने सुऊवातीपासूनच आक्रमण केले आणि सर्व काही त्याच्या नियंत्रणात असल्याचे दिसत होते. तथापि, शेवटच्या टप्प्यात झालेल्या त्याच्या चुकीनंतर नाकामुराने बाजी परतविली.
महिला विभागात युक्रेनियन अॅना मुझीचुकने दोन वेळची जागतिक रॅपिड चॅम्पियन कोनेरू हम्पीवर विजय मिळवला. युक्रेनियन खेळाडूने सुऊवातीपासून फायदा उठवत पद्धतशीरपणे दबाव वाढवला. आर. वैशाली रमेशबाबू आणि चीनची टिंगजी लेई तसेच स्पॅनिश-इराणी खेळाडू सरसादत खादेमलशारीह व वेनजुन जू यांच्यातील महिला गटातील इतर दोन सामने बरोबरीत संपले. पण त्यानंतर टिंगजी लेई आणि वेनजून जू यांनी त्यांचे आर्मागेडन सामने जिंकत अतिरिक्त अर्धा गुण मिळविला.









