वृत्तसंस्था/सिंगापूर
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील कोंडी कायम राहिली असून भारतीय आव्हानवीर डी. गुकेश आणि गतविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यातील गुऊवारी झालेला नववा सामनाही अनिर्णीत राहिला. सलग सहाव्या आणि लढतीतील एकंदरित सातव्या बरोबरीनिशी दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 4.5 गुणांच्या समान स्तरावर आणून सोडले आहे. लढत जिंकण्यासाठी आणखी 3 गुणांची गरज आहे. दोन्ही खेळाडूंनी 54 चालींनंतर सामना बरोबरीत सोडविण्याचे ठरविले.
शुक्रवारी विश्रांतीचा दिवस असून ते शनिवारी पुन्हा लढत सुरू करतील. 2.5 दशलक्ष डॉलर्स बक्षीस रकमेच्या या लढतीत फक्त आणखी पाच क्लासिकल सामने खेळायचे बाकी आहेत आणि 14 फेऱ्यांनंतरही बरोबरी कायम राहिल्यास विजेता निश्चित करण्यासाठी वेगवान वेळेच्या नियंत्रणाखाली सामने होतील. 32 वर्षीय लिरेनने सुऊवातीचा सामना जिंकला होता, तर 18 वर्षीय गुकेशने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला होता. दुसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा सामना अनिर्णीत राहिला.









